Anushka Tapshalkar
रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड ट्रम्प यांनी काल अनेक बड्या नेत्यांच्या आणि उद्योगपतींच्या उपस्थितीत अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीच्या खास स्वागत समारंभात नीता अंबानी पारंपरिक आणि आकर्षक पोशाखात सहभागी झाल्या होत्या.
नीता अंबानी यांनी भारताची संस्कृतीत दर्शविणारी, भारतीय मंदिरांची नक्षीकाम असलेली कांचीपुरम साडी घातली होती.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कुम्भरकार बी. कृष्णमूर्ती यांच्या डिझाइन केलेल्या साडीमध्ये इरुथलाइपक्षी, मयिल आणि सोरगवसाल यांसारखे प्रतीकात्मक नक्षी होते.
रंगीबेरंगी कांचीपुरम साडीला मनीष मल्होत्रा यांनी डिझाइन केलेल्या मखमली ब्लाऊजची जोड देण्यात आली होती, ज्यामुळे पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर मिलाफ दिसून येत होता.
नीता अंबानींनी 18व्या शतकातील दक्षिण भारतीय कुंदन पद्धतीने तयार केलेले प्राचीन हेरिटेज पेंडंट घातले होते.
या पेंडंटमध्ये पोपटाच्या आकाराचे डिझाइन होते, ज्यात माणिक, पन्ना, हिरे, मोती आणि लाल-हिरव्या मुलाम्याच्या सुंदर कामाने सजावट केली होती.
नीता अंबानी यांनी भारताच्या पारंपरिक कापड आणि दागिन्यांची सुंदरता दाखवत देशाच्या सांस्कृतिक वारशाला मान दिला.