Pranali Kodre
ख्राईस्टचर्च येथे न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संघात २८ नोव्हेंबरपासून कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला.
या सामन्यात न्यूझीलंडचा स्टार फलंदाज केन विलियम्सनने दोन्ही डावात ९३ आणि ६१ धावांच्या अर्धशतकी खेळी केल्या.
या सोबतच विलियम्सनने कसोटी क्रिकेटमध्ये ९००० हजार धावांचा टप्पा पार केला आहे.
विलियम्सन ९००० कसोटी धावा करणारा न्यूझीलंडचा पहिलाच, तर जगातील १९ वा खेळाडू ठरला आहे.
विलियम्सनने कसोटीमध्ये १८२ डावात ९००० धावा पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे तो सर्वात कमी डावात ९००० कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ८ व्या क्रमांकावर आला आहे.
तसेच फॅब फोरमधील स्टीव्ह स्मिथ, जो रुट आणि विराट कोहली यांच्यापेक्षा सर्वात उशीरा ९००० धावा विलियम्सनने केल्या असल्या तरी तो चौघांमध्ये हा टप्पा सर्वात जलद गाठणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू आहे.
फॅब फोरमध्ये विलियम्सनपेक्षा केवळ स्टीव्ह स्मिथने कमी डावात ९००० कसोटी धावा पूर्ण केल्या आहेत. स्मिथने १७४ डावात ९००० कसोटी धावा केल्या होत्या. याबाबतीत विलियम्सनने विराट कोहली आणि जो रुटला मागे टाकले आहे.
जो रुटने १९६ डावात आणि विराट कोहलीने १९७ डावात कसोटीमध्ये ९००० धावा केल्या होत्या.
कुमार संगकारा (१७२ डाव), स्टीव्ह स्मिथ (१७४ डाव), राहुल द्रविड (१७६ डाव), ब्रायन लारा (१७७ डाव),रिकी पाँटिंग (१७७ डाव), माहेला जयवर्धने (१७८ डाव), सचिन तेंडुलकर (१७९ डाव), केन विलियम्सन (१८२ डाव),युनूस खान (१८४ डाव), जॅक कॅलिस ( १८८ डाव).
सुनील गावसकर (१९२ डाव), ग्रॅमी स्मिथ (१९५ डाव), जो रुट (१९६ डाव), विराट कोहली (१९७ डाव), ऍलिस्टर कूक (२०४ डाव), हाशिम आमला (२०४ डाव),ऍलन बॉर्डर (२०७ डाव), स्टीव वॉ (२१६ डाव), शिवनारायण चंद्रपॉल (२१६ डाव)