कंगनानं दिलं राहुल गांधींना आव्हान

Anuradha Vipat

आव्हान

कंगनाने राहुल गांधींना पप्पू म्हणत त्यांना आव्हान दिलं आहे.

प्रचार सभा

हिमाचलमधल्या मनालीमध्ये कंगनाने प्रचार सभा घेतली. त्यावेळी तिने राहुल गांधींना आव्हान दिलं आहे.

काँग्रेसच्या लोकांकडून

यावेळी “काँग्रेसचा विचार महिला विरोधी आहे. शक्तिचा विनाश करायचा आहे हे दिल्लीतला मोठा पप्पू (राहुल गांधी) म्हणतो. त्यामुळे या काँग्रेसच्या लोकांकडून काय अपेक्षा करणार? ” असा प्रश्न कंगनाने विचारला आहे.

महिलांनी राजकारणात यावं म्हणून

एकीकडे या प्रकारची घाणेरडी विचारधारा असलेले पुरुष आहेत. दुसरीकडे आपल्या सगळ्यांचे लाडके नरेंद्र मोदी आहेत. त्यांनी महिलांनी राजकारणात यावं म्हणून ३३ टक्के आरक्षण दिलं आहे.” असंही यावेळी कंगनाने म्हटलं आहे.

माझं खुलं आव्हान...

मला धमक्या देणाऱ्या, आव्हान देणाऱ्या सगळ्यांना माझं खुलं आव्हान आहे, की राजकारण ही तुमची वडिलोपार्जित संपत्ती नाही. मला घाबरवून, धमक्या देऊन काही होणार नाही. असंही कंगना म्हणाली

त्याने माझ्या चित्रपटातला...

मी राहुल गांधीला इथे बोलवू इच्छिते, त्याने माझ्या चित्रपटातला एक सीन मला करुन दाखवावा. तो सीन जर त्याने करुन दाखवला मी राजकारण काय भारत सोडून निघून जाईन असंही कंगना म्हणाली.

तापसी पन्नूने लग्न गुपित का ठेवलं याबाबत केला खुलासा