Anuradha Vipat
कंगना राणौत पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत.
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी भिंद्रनवाले यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणी केली.
या टिप्पणीनंतर कंगना यांना थेट भाजप नेत्याकडून सक्त ताकिद मिळाली आहे.
मुलाखतीत कंगना यांनी भिंद्रनवाले यांना पंजाबच्या इतिहासातील फूट पाडणारी व्यक्ती असं संबोधलं होतं
तसेच कंगनाने त्यांना ‘दहशतवादी’ असंही म्हटलं आहे .
ते काही संत नव्हते तर तो एक दहशतवादी होता. हा आपल्या इतिहासाचा एक भाग आहे, जो जाणीवपूर्वक लपवून ठेवला गेला आहे. आपल्याला याबद्दल सांगितलं जात नाही असं कंगना म्हणाली आहे
यावर आता कंगना यांनी अनावश्यक टिप्पणी करू नये, ज्यामुळे शीख समुदायाच्या भावना दुखावू शकतील, असं भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सोमप्रकाश म्हणाले.