सकाळ डिजिटल टीम
बॉलीवूडची बिनधास्त क्वीन कंगना राणावत अभिनय, दिग्दर्शन आणि राजकारणाच्या क्षेत्रात यशस्वी झाली आहे. आता ती मनालीत नवीन कॅफे सुरू करत आहे.
कंगनाचा कॅफे १४ फेब्रुवारी, व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी भव्य उद्घाटन सोहळ्याने सुरू होईल.
कंगनाने तिच्या कॅफेच्या उद्घाटनासाठी पहिले निमंत्रण दीपिका पादुकोणला दिलं आहे, जो एक खास आणि आकर्षक गोष्ट ठरली आहे.
कंगना आणि दीपिकाचं नातं बॉलीवूडमध्ये अनेकदा चर्चेचा विषय ठरलं आहे. कधी कटुता, तर कधी परस्पर आदर देखील दिसला आहे.
एका मुलाखतीत कंगनाने स्वतःचं रेस्टॉरंट सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती, ज्यावर दीपिकाने मजेशीरपणे “मी तुझी पहिली क्लायंट बनेन” असं उत्तर दिलं होतं.
कंगनाने आता दीपिकाला तिच्या संवादाची आठवण करून निमंत्रण दिलं आहे, जे विशेष चर्चेचा विषय बनलं आहे.
कॅफेच्या उद्घाटनाच्या दिवशी कंगना अनेक सेलिब्रिटींना आमंत्रित करत असून, हे सोहळा रोमांचक असणार आहे.