मुलीला सासरी पाठवण्याची परंपरा कधी सुरू झाली? पहिले कन्यादान कोणी केलं होतं?

Yashwant Kshirsagar

कन्यादान म्हणजे काय?

कन्यादान हा हिंदू विवाहातील अत्यंत महत्त्वाचा आणि भावपूर्ण विधी आहे. वधूचे पालक आपल्या मुलीचा हात वराच्या हातात सोपवतात आणि तिला नवीन आयुष्यासाठी आशीर्वाद देतात.

kanyadan in Hindu Marriage

|

esakal

कन्यादान शब्दार्थ

‘कन्या’ म्हणजे मुलगी आणि ‘दान’ म्हणजे सोपवणे. या विधीत वडील मुलीचा हात वराच्या हातात देतात आणि वर तिच्या जबाबदाऱ्या स्वीकारतो.

kanyadan in Hindu Marriage

|

esakal

विधीचे महत्त्व

कन्यादान अनिवार्य आणि पवित्र मानला जाते. ते पालकांनी मुलीला नवीन कुटुंबात सोपवण्याचे आणि तिच्या सुखी भविष्यासाठी आशीर्वाद देण्याचे प्रतीक आहे.

kanyadan in Hindu Marriage

|

esakal

पहिले कन्यादान कोणी केले?

हिंदू मान्यतेनुसार पहिले कन्यादान दक्ष प्रजापतींनी केले. त्यांनी आपल्या कन्यांना चंद्रदेवाला सोपवले.

kanyadan in Hindu Marriage

|

esakal

दक्ष प्रजापतींच्या २७ कन्या

दक्ष प्रजापतींना २७ कन्या होत्या. त्यांचा विवाह चंद्रदेवाशी लावण्यात आला. या कन्यांना २७ नक्षत्रांचे प्रतीक मानले जाते.

kanyadan in Hindu Marriage

|

esakal

धारणा

विश्वाचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि परंपरा अखंडित राखण्यासाठी दक्ष प्रजापतींनी आपल्या कन्या चंद्रदेवाच्या स्वाधीन केल्या, अशी धारणा आहे.

kanyadan in Hindu Marriage

|

esakal

कन्यादानाची सुरुवात

या पौराणिक कथेतूनच विवाहातील कन्यादान परंपरेचा उगम झाला. आजही हा विधी वैदिक मंत्रांसह केला जातो.

kanyadan in Hindu Marriage

|

esakal

मुलीला सासरी पाठवण्याची परंपरा

लग्नानंतर मुलीला पतीच्या घरी पाठवण्याची प्रथाही याच कथेतून आली. दक्ष प्रजापतींनी कन्यांना चंद्रदेवाला सोपवल्या, त्यामुळे ही परंपरा सुरू झाली.

kanyadan in Hindu Marriage

|

esakal

परंपरेचे प्रतीकात्मक अर्थ

ही प्रथा पालकांनी मुलीला वरासोबत नवीन आयुष्याच्या प्रवासासाठी निरोप देण्याचे आणि तिच्या नवीन कुटुंबात स्थैर्य देण्याचे प्रतीक आहे.

kanyadan in Hindu Marriage

|

esakal

आजही जिवंत परंपरा

कालांतराने कन्यादान हिंदू विवाहसोहळ्यांचा अविभाज्य भाग बनला. तो आजही प्रेम, जबाबदारी आणि आशीर्वादाचे प्रतीक म्हणून पाळला जातो.

kanyadan in Hindu Marriage

|

esakal

काश्मिरी महिलांच्या सौंदर्याचं गुपित काय? हजारो वर्षांपूर्वीच्या उपायात दडलंय रहस्य

Kashmiri Beauty Secrets

|

esakal

येथे क्लिक करा