kimaya narayan
अभिनेत्री तेजश्री प्रधान सध्या खूप चर्चेत आहे. सोशल मीडियावरील तिचे फोटोही व्हायरल होत आहेत.
तेजश्रीने आजवर अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिच्या अनेक भूमिका गाजल्या आहेत.
होणार सून मी ह्या घरची मालिकेतील तिची जान्हवी ही भूमिका खूप गाजली. तिचा काहीही हा श्री हा डायलॉग खूप गाजला.
तर अग्गबाई सासूबाई मालिकेतील शुभ्रा भूमिकेनेही सगळ्यांची मन जिंकली.
तर स्टार प्रवाहवरील मुक्ताची भूमिकाही हिट ठरली.
पण तेजश्रीला यापैकी कोणतीही भूमिका साकारायची नाहीये. तर तिला एक वेगळीच भूमिका साकारायची आहे. ही भूमिका आहे आर जेची. जी तिने असेही एकदा व्हावे या सिनेमात साकारली होती.
एका मुलाखतीत तेजश्रीने ही भूमिका परत साकारण्याची इच्छा व्यक्त केली. ही भूमिका आता ती अधिक चांगल्या पद्धतीने करू शकली असती असं तिने म्हटलं.