kimaya narayan
मराठी इंडस्ट्रीमधील दिवंगत ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांचे आजही अनेक चाहते आहेत.
सुलभा यांचा मुलगाही इंडस्ट्रीत कार्यरत आहे आणि त्यांनी त्यांच्या अभिनयाने इंडस्ट्रीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
सुलभा यांच्या मुलाचं नाव आहे निनाद अरविंद देशपांडे. गेला बराच काळ ते मराठी इंडस्ट्रीमध्ये कार्यरत आहेत.
अविष्कार या संस्थेतूनच निनाद यांच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. पण स्टार प्रवाहवरील मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील भूमिका लोकप्रिय ठरली. त्यांनी साकारलेले सार्थकचे वडील अनेकांना आवडले.
आई कुठे काय करते या मालिकेतही त्यांनी साकारलेली अनघाच्या वडिलांची भूमिका गाजली.
निनाद यांनी आजवर अनेक नाटकांमध्येही काम केलं आहे.