सकाळ डिजिटल टीम
कराष्टमी म्हणजे काय? तुम्हाला माहित आहे का या सणाचे महत्व आणि इतिहास काय आहे.
Karashtami
sakal
कराष्टमी या सणाचे महत्व आणि इतिहास काय आहे जाणून घ्या.
Karashtami
sakal
कराष्टमी हा सण दसऱ्यानंतर दिवाळीच्या सुरुवातीचा संदेश देतो. हा सण अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला साजरा केला जातो आणि यात देवीची पूजा केली जाते
Karashtami
sakal
काही ठिकाणी कालभैरवाच्या पूजेचाही समावेश असतो. या पूजेचे महत्त्व म्हणजे ही दिवाळीची सुरुवात आहे आणि शेतीत पिकलेल्या पिकांची (विशेषतः ज्वारीची) ही पूजा केली जाते.
Karashtami
sakal
या पूजेमध्ये शेतातून घरात आणलेल्या पिकांची पूजा केली जाते. विशेषतः ज्वारीच्या धान्याची पूजा केली जाते, कारण ज्वारी हे पूर्वी मुख्य पीक होते.
Karashtami
sakal
काही ठिकाणी तांबे ठेवून त्यात धान्य टाकुन पूजा होते, तर काही ठिकाणी धांडे लावून पूजा होते. मात्र, दोन्हीकडे हेतू एकच असतो आपल्या गुरांढोरांप्रती आदर, धान्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणे.
Karashtami
sakal
पौराणिक मान्यतेनुसार कालभैरव हे भगवान शिवाचा पाचवा अवतार आहे. या दिवशी माँ दुर्गेची पूजा करण्याचाही नियम आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, कराष्टमी ही प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या आठव्या दिवशी साजरी केली जाते. शिवशंकराचे रुद्र रूप असलेल्या कालभैरवाची या दिवशी पूजा केली जाते. कालभैरवाला काशीचा कोतवाल असेही म्हणतात.
Karashtami
sakal
कराष्टमी हा भगवान शिवाच्या भक्तांसाठी महत्त्वाचा दिवस आहे, सूर्योदयापूर्वी उठून लवकर स्नान करा. कालभैरवाची विशेष पूजा करा आणि तुमच्या सर्व पापांची क्षमा आणि आशीर्वाद घ्या.
Karashtami
sakal
हिंदू धर्मात कराष्टमीला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी केलेली पूजा भक्तांना सर्व संकटांपासून मुक्ती देते, असे मानले जाते.
Karashtami
sakal
Countries that Celebrate Diwali Other than India
sakal