बाळकृष्ण मधाळे
स्वर्गालाही लाजवेल इतकी सुंदर ही ५ हिल स्टेशन्स कर्नाटकात वसलेली असून, सुट्टीच्या काळात निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याची उत्तम संधी देतात.
Karnataka Hill Stations
esakal
भारतामध्ये अनेक रम्य पर्यटनस्थळे आहेत; मात्र निसर्गसौंदर्य, हिरवाई आणि आल्हाददायक हवामान यामुळे कर्नाटकाचे स्थान वेगळेच आहे.
Karnataka Hill Stations
esakal
या राज्यात असंख्य हिल स्टेशन्स असून, त्यापैकी काही ठिकाणे पर्यटकांच्या विशेष पसंतीस उतरली आहेत. आज आपण कर्नाटकातील अशाच पाच प्रमुख आणि आकर्षक हिल स्टेशन्सची ओळख करून घेऊया..
Karnataka Hill Stations
esakal
दक्षिण भारतातील ‘चेरापुंजी’ म्हणून ओळखले जाणारे अगुम्बे हे ठिकाण भरपूर पावसासाठी आणि थंड, प्रसन्न हवामानासाठी प्रसिद्ध आहे. धुक्याने वेढलेली डोंगररांग, हिरवीगार जंगले आणि अप्रतिम सूर्यास्त अनुभवण्यासाठी अगुम्बे एक उत्तम ठिकाण आहे.
Karnataka Hill Stations
esakal
शिमोगा हा परिसर आपल्या भव्य धबधब्यांसाठी आणि दाट जंगलांसाठी ओळखला जातो. निसर्गप्रेमी आणि साहसी पर्यटकांसाठी शिमोगा हे आकर्षणाचे केंद्र आहे.
Karnataka Hill Stations
esakal
कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यान हे ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असून, घोड्याच्या आकाराच्या टेकड्यांमुळे या ठिकाणाला ‘कुद्रेमुख’ असे नाव पडले आहे. हिरव्या कुरणांमधून जाणारे ट्रेकिंग मार्ग आणि समृद्ध जैवविविधता येथे अनुभवता येते.
Karnataka Hill Stations
esakal
‘भारताचे स्कॉटलंड’ म्हणून ओळखले जाणारे कुर्ग (कोडगू) हे ठिकाण हिरवीगार डोंगररांग, विस्तीर्ण कॉफीच्या बागा आणि शांत वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. शहराच्या गोंगाटापासून दूर शांत सुट्टी घालवण्यासाठी कुर्ग सर्वोत्तम मानले जाते.
Karnataka Hill Stations
esakal
कॉफीची राजधानी म्हणून ओळखले जाणारे चिक्कमंगळूर हे पर्वत, दाट जंगले आणि थंड हवामानासाठी प्रसिद्ध आहे. निसर्गाच्या सान्निध्यात आरामदायी सहल करायची असल्यास चिक्कमंगळूर हा उत्तम पर्याय आहे.
Karnataka Hill Stations
esakal
Chhatrapati Sambhajinagar Tourism
esakal