भारतात सर्वाधिक कॉफीचे उत्पादन कोणत्या राज्यात होते?

Pranali Kodre

भारत - कॉफी उत्पादक देश

भारत हा चहाप्रेमी जरी असला, तरी जगातील सर्वात मोठ्या कॉफी उत्पादक देशांपैकी देखील एक आहे.

India's Largest Coffee Producing State

|

Sakal

४०० वर्षांपूर्वी कॉफीचे आगमन

सुमारे ४०० वर्षांपूर्वी सुफी संत बाबा बुडान यांच्यामार्फत कॉफी भारतात आली, असं म्हटलं जातं. त्यांनी कर्नाटकाच्या चिकमंगलूरच्या डोंगराळ भागात कॉफीची बियाणं पेरली, अशी सांगितलं जातं.

India's Largest Coffee Producing State

|

Sakal

सर्वात मोठे कॉफी उत्पादक राज्य

भारतात कर्नाटक हे कॉफीचं सर्वात मोठं उत्पादक राज्य आहे.

India's Largest Coffee Producing State

|

Sakal

अरबिया किंवा रोबस्टा कॉफी

एकट्या कर्नाटक राज्यातूनच सुमारे ७०-७१ टक्के कॉफीचे उत्पादन होते. भारतीय अरबिया किंवा रोबस्टा कॉफीचे मुख्यत: कर्नाटकमध्ये उत्पादन होते.

India's Largest Coffee Producing State

|

Sakal

कॉफी उत्पादनाची मुख्य ठिकाणे

कर्नाटकमधील मुख्यत: चिकमंगलूर, कुर्ग (कोडागू), आणि हासनसारख्या धुकेदाऱ्या डोंगराळ भागात कॉफीचे उत्पादन होते.

India's Largest Coffee Producing State

|

Sakal

कॉफीच्या लागवडीसाठी उत्तम परिस्थिती

अशा डोंगराळ भागात कॉफीच्या लागवडीसाठी उत्तम परिस्थिती आहे, येथे उंची, भरपूर पाऊस, सुपीक माती आणि पुरेशी सावली मिळते.

India's Largest Coffee Producing State

|

Sakal

कॉफीची लागवड

कर्नाटकात कॉफी सिल्वर ओक झाडाच्या सावलीत आणि मसाल्यांसोबत पेरली जाते. त्यामुळे कॉफीच्या बियाणांना मिरी, वेलची आणि दालचिनीच्या झाडांचा सुगंधही मिळतो.

India's Largest Coffee Producing State

|

Sakal

कॉफी उत्पादक राज्य

कर्नाटकनंतर भारतात केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये सर्वाधिक कॉफीचे उत्पादन होते.

India's Largest Coffee Producing State

|

Sakal

सर्फराजचे १७ किलो वजन कमी! डाएटमधली ‘ग्रीन कॉफी’ आहे तरी काय? वाचा फायदे

Green Coffee | Sarfaraz Khan’s Weight Loss Secret Drink | Sakal
येथे क्लिक करा