सकाळ डिजिटल टीम
नाशिकमधील कार्तिक स्वामीचे सुंदर आणि भक्तिमय वातारणात असलेले हे मंदिर तुम्ही पाहीले आहे का?
Nashik Karthik Swami Temple
sakal
हे मंदिर नाशिक, पंचवटी येथे आहे. विशेषतः शनि चौक, सुकेनगर लेन, पंचवटी या ठिकाणी आहे.
Nashik Karthik Swami Temple
sakal
पंचवटीतील हे मंदिर दररोज संध्याकाळी ९:०० वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असते. मोठ्या उत्सवांमध्ये या मंदिराच्या वेळेत बदल होण्याची शक्यता असते.
Nashik Karthik Swami Temple
sakal
या मंदिरात कार्तिक पौर्णिमेला मोठा उत्सव असतो. या दिवशी दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते.
Nashik Karthik Swami Temple
sakal
पंचवटीतील या मंदिराचे व्यवस्थापन श्री काशी नाट्टकोटीई नगर छत्रम मॅनेजमेंट सोसायटीतर्फे केले जाते.
Nashik Karthik Swami Temple
sakal
कार्तिक स्वामींची काही मंदिरे (उदा. बुलढाण्यातील खामगाव) वर्षातून केवळ एकदाच कार्तिक पौर्णिमेला उघडली जातात. यामागे एक पौराणिक आख्यायिका आहे की, रागाने तपश्चर्येला गेलेले कार्तिक स्वामी या एकाच दिवशी भक्तांना दर्शन देतात.
Nashik Karthik Swami Temple
sakal
अनेक ठिकाणी असा समज आहे की, स्त्रियांनी कार्तिक स्वामींचे दर्शन घेऊ नये. मात्र, सध्याच्या काळात अनेक मंदिरांमध्ये विशेषत: कार्तिक पौर्णिमेला महिलाही मोठ्या संख्येने दर्शन घेतात आणि हा समज आता कमी होताना दिसत आहे.
Nashik Karthik Swami Temple
sakal
या मंदिराचा संबंध पौराणिक कथेतील शिव-पार्वती यांच्यातील पृथ्वी प्रदक्षिणेच्या स्पर्धेशी जोडलेला आहे, ज्यानंतर कार्तिक स्वामी तपश्चर्येला निघून गेले होते. अशी श्रद्धा आहे.
Nashik Karthik Swami Temple
sakal
हे मंदिर पंचवटी येथे असल्यामुळे मंदिराचा परिसर शांत आणि सुंदर आहे, ज्यामुळे येथे दर्शन घेतल्या नंतर भक्तांच्या मनाला शांती मिळते.
Nashik Karthik Swami Temple
sakal
Sakal