आठवड्यातून फक्त एकदाच खा 'ही' भाजी! ब्लड शुगर नियंत्रणात राहील अन् हॉर्ट अटॅकचा धोकाही कायमचा होईल दूर

सकाळ डिजिटल टीम

कर्टुले भाजीचे आरोग्यादायी फायदे

पावसाळा आला की बाजारात एक खास भाजी दिसू लागते, ‘कर्टुले’! इंग्रजीत Spiny Gourd म्हणून ओळखली जाणारी ही हिरव्या रंगाची अंडाकृती भाजी केवळ चविष्ट नाही, तर आरोग्यासाठीही अतिशय फायदेशीर आहे.

Kartule Bhaji Benefits | esakal

आठवड्यातून कितीवेळा 'कर्टुले' खावे?

आठवड्यातून एकदाच 'कर्टुले' खाल्लं, तरी ते तुमच्या आरोग्याला पाच पटीने अधिक बळकटी देऊ शकतं. चला जाणून घेऊया या भाजीत दडलेले ५ चमत्कारिक आरोग्य फायदे :

Kartule Bhaji Benefits | esakal

यकृताला बळकटी देते

‘कर्टुले’मध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फ्लेव्होनॉइड्स असल्यामुळे ते फॅटी लिव्हर टाळण्यासाठी उपयुक्त ठरते. यकृताच्या कार्यात सुधारणा करण्यासाठी आठवड्यातून एकदाच या भाजीचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

Kartule Bhaji Benefits | esakal

ब्लड शुगर नियंत्रित ठेवते

‘कर्टुले’मध्ये कमी कॅलरीज, कमी कार्बोहायड्रेट्स आणि भरपूर फायबर असते, जी रुग्णांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. इन्सुलिनची कार्यक्षमता वाढवून रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, असे NIH च्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.

Kartule Bhaji Benefits | esakal

दाह व सूज कमी करते

सांधेदुखी, सूज किंवा ताप असल्यास कर्टुलेचा उपयोग नैसर्गिक दाहशामक औषध म्हणून केला जातो. त्याचे अर्क वेदना आणि जळजळ कमी करण्याचे काम करतात, असं पोषणतज्ज्ञ सांगतात.

Kartule Bhaji Benefits | esakal

दृष्टी सुधारते

व्हिटॅमिन A ने परिपूर्ण असलेली ही भाजी नजर सुधारण्यात आणि रात्रीच्या अंधत्वाचा धोका कमी करण्यात मदत करते. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी ही भाजी डोळ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे.

Kartule Bhaji Benefits | esakal

हृदय आणि मूत्रपिंडांचे आरोग्य सुधारते

‘कर्टुले’मध्ये असलेले मूत्रवर्धक गुणधर्म रक्तदाब नियंत्रित ठेवतात, मूत्रपिंडांवरील ताण कमी करतात. तसेच, हे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करून हृदयाला अतिरिक्त सुरक्षा देण्यास मदत करते.

Kartule Bhaji Benefits | esakal

स्वस्थ जीवनासाठी 'कर्टुले' नक्की खा!

‘कर्टुले’ ही भाजी फक्त स्वादासाठी नाही, तर आरोग्याच्या संरक्षणासाठी एक वरदान आहे. आठवड्यातून एकदाच याचे सेवन केल्यास तुम्ही मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल आणि दृष्टीदोष यांपासून नैसर्गिकरित्या दूर राहू शकता.

Kartule Bhaji Benefits | esakal

म्हातारपणी आरोग्य टिकवायचंय? मग 'ही' फळं भरपूर खा, ही खाऊ नका!

Fruits To Avoid After 60 | esakal
येथे क्लिक करा..