Kas Plateau Online Booking : 'कास'चे ऑनलाइन बुकिंग सुरू; 1 सप्टेंबरपासून पुष्प पठाराचा हंगाम

बाळकृष्ण मधाळे

'कास'चा हंगाम १ सप्टेंबरपासून सुरू

कास : जगप्रसिद्ध पुष्प पठार कासचा यंदाचा हंगाम १ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. पर्यटकांना कास पठाराला भेट देण्यासाठी आगाऊ ऑनलाइन बुकिंगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.kas.ind.in या संकेतस्थळावरून बुकिंग करता येणार आहे.

Flower season in Kaas Plateau

|

esakal

शनिवार-रविवारी ऑनलाइन बुकिंग अनिवार्य

शनिवार, रविवार तसेच इतर सरकारी सुट्टीच्या दिवशी कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांना फक्त ऑनलाइन बुकिंग केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. या दिवशी थेट कास पठारावर येणाऱ्या पर्यटकांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे पर्यटकांनी आगाऊ बुकिंग करूनच कासला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Kas Plateau flower season 2026

|

esakal

चवर फुलांचा बहर

सध्या कास पठारावर चवर या फुलांचा बहर पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर इतरही विविध प्रकारची फुले तुरळक स्वरूपात उमलण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात फुलांचा बहर वाढण्याची शक्यता आहे.

Kas Plateau flower season 2026

|

esakal

प्रतिव्यक्ती २०० रुपये प्रवेश शुल्क

कास पठारावर प्रवेशासाठी प्रतिव्यक्ती २०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. या शुल्कामध्ये पार्किंगच्या ठिकाणापासून कास पठारापर्यंत जाण्यासाठी मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक ग्रुपला एक माहितीपत्रिका मोफत दिली जाणार आहे.

Kas Plateau flower season 2026

|

esakal

दुर्बिणीतून परिसराचे मोफत दर्शन

कास पठारावरील एकीव वॉच टॉवर येथे उभारण्यात आलेल्या दुर्बिणीतून कण्हेर जलाशय व परिसराचे दर्शन पर्यटकांना मोफत घेता येणार आहे. तसेच कुमुदिनी तलाव वॉच टॉवर येथून दुर्बिणीद्वारे कास तलाव परिसराचे दर्शनही मोफत पाहता येणार आहे.

Kas Plateau flower season 2026

|

esakal

इलेक्ट्रिक बससाठी १०० रुपये शुल्क

राजमार्गापासून कुमुदिनी तलावापर्यंत जाण्यासाठी इलेक्ट्रिक बस सेवा उपलब्ध आहे. या सेवेसाठी प्रति व्यक्ती ये-जा करण्याकरिता १०० रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

Kas Plateau flower season 2026

|

esakal

विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क

शालेय विद्यार्थ्यांसाठी शनिवार, रविवार आणि इतर सरकारी सुट्टीचे दिवस वगळता प्रति विद्यार्थी ४० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या गटासाठी संबंधित शाळेच्या प्राचार्यांचे पत्र आवश्यक राहणार आहे.

Kas Plateau flower season 2026

|

esakal

गाईडसाठी २०० रुपये शुल्क

कास पठाराची माहिती पर्यटकांना सविस्तरपणे मिळावी यासाठी गाईडची सुविधाही उपलब्ध आहे. किमान दहा जणांच्या ग्रुपसाठी एका तासाकरिता २०० रुपये गाईड शुल्क आकारले जाणार आहे.

Kas Plateau flower season 2026

|

esakal

Monsoon Travel : पावसाळ्यात स्वर्गाचा अनुभव! साताऱ्यातील 'या' 10 ठिकाणांना भेट दिली नाही, तर तुमची मान्सून ट्रिप अपूर्णच राहिल

Monsoon Tourism India

|

esakal

येथे क्लिक करा...