सकाळ डिजिटल टीम
काश्मीरला 'पृथ्वीवरील स्वर्ग' असे संबोधले जाते. कारण, येथील बर्फाच्छादित पर्वत, नितांतसुंदर दऱ्या, शांत तलाव आणि निसर्गाने सजवलेले परिसर प्रत्येक पर्यटकाला भुरळ घालतात.
Hidden Places Kashmir
esakal
पहलगाम, गुलमर्ग, सोनमर्ग, दल तलाव अशी नावे सर्वपरिचित असली, तरी काश्मीरमध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत जी अजूनही पर्यटकांच्या नजरेसून दूर आहेत.
Hidden Places Kashmir
esakal
ही ठिकाणे निसर्गाच्या कुशीत अनोखी शांतता, अवर्णनीय सौंदर्य आणि मनाला स्पर्श करणारा अनुभव देतात. पुढच्या काश्मीर ट्रिपमध्ये नक्की समाविष्ट करावी अशी काही ठिकाणे पाहूया..
Hidden Places Kashmir
esakal
उन्हाळ्यात गुलमर्ग रंगीबेरंगी फुलांनी फुलून जाते, तर हिवाळ्यात ते संपूर्ण पांढऱ्या बर्फात झळकते. भारतातील सर्वात प्रसिद्ध स्कीइंग डेस्टिनेशन म्हणून गुलमर्ग प्रसिद्ध आहे. आशियातील सर्वाधिक उंचीवर असलेली ‘गुलमर्ग गोंडोला’ ही पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण ठरते.
Hidden Places Kashmir
esakal
सोनमर्गचे नावच त्याचे सौंदर्य सांगते. बर्फाच्छादित शिखरे, हिरवीगार कुरणे आणि शांत वातावरण येथे मिळते. थजवास ग्लेशियर पर्यंतचा ट्रेक साहसप्रेमींसाठी स्वर्गासारखा अनुभव आहे.
Hidden Places Kashmir
esakal
शिकारा राईड्स, हाऊसबोट्स आणि तरंगते बाजार दल लेकचे मुख्य आकर्षण आहेत. सूर्यास्ताच्या वेळी येथील तलावात सोनेरी किरणं दिसतात. निशात बाग आणि मुघल गार्डन्स येथे शांत संध्याकाळ घालवण्यासाठी उत्तम आहेत.
Hidden Places Kashmir
esakal
श्रीनगरपासून सुमारे ५० किमी अंतरावर असलेले युसमार्ग हे एक शांत, अप्रतिम आणि कमी परिचित पर्यटनस्थळ आहे. देवदारच्या जंगलांनी वेढलेले परिसर, ढगांना स्पर्श करणाऱ्या टेकड्या आणि मेंढ्या चरण्याचे रम्य दृश्य यामुळे हे ठिकाण परीकथेतील दृश्यासारखे भासते.
Hidden Places Kashmir
esakal
दूधासारखे स्वच्छ आणि शुभ्र पाणी असलेल्या ओढ्यांमुळे झालेले हे ठिकाणाचे नाव ‘दूधपथरी’ अगदी सार्थ ठरते. हिरवीगार विस्तीर्ण कुरणे, निळे आकाश आणि उंच डोंगर यामुळे हे ठिकाण पिकनिकसाठी आदर्श आहे.
Hidden Places Kashmir
esakal
कुपवाडा जिल्ह्यातील बांगस व्हॅली आता पर्यटकांमध्ये प्रसिद्ध होत आहे. वाहती नदी, हिरवाईने नटलेल्या दऱ्या आणि फुलांनी झाकलेले कुरण यामुळे येथे अत्यंत शांत आणि आत्मिक समाधान मिळते. गर्दीपासून दूर मनःशांती मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
Hidden Places Kashmir
esakal
Kochi Tourism
esakal