Saisimran Ghashi
किडनी आपल्या शरीराचा महत्वपूर्ण भाग आहे
याच किडनीला निरोगी ठेवण्यासाठी काही गोष्टी लक्षणात घेतल्या पाहिजेत
दररोज ८–१० ग्लास पाणी पिण्याने शरीरातील टॉगजीन्स किडनीमार्फत सहज बाहेर टाकले जातात, जे किडनीसाठी फायदेशीर असते.
जास्त मीठ, साखर व प्रोसेस्ड फूड टाळा. फळे, भाज्या, धान्ये आणि प्रथिनयुक्त अन्न खा. यामुळे किडनीवरील ताण कमी राहतो.
मधुमेह, उच्च रक्तदाब टाळण्यासाठी चालणे, योग किंवा इतर शारीरिक क्रियाकलाप नियमित करा. या दोन गोष्टी किडनीच्या आजारांशी थेट संबंधित असतात.
पेनकिलर, अँटीबायोटिक्स किंवा कोणतीही औषधे दीर्घकाळ वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. काही औषधे किडनीस हानी पोहोचवू शकतात.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा
ही केवळ सामान्य माहिती आहे. ही लक्षणे असल्यास किंवा आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.