Aarti Badade
मोबाईलसाठी विशेष वॉटरप्रूफ झिप लॉक पाउच किंवा केस वापरल्यास पावसातसुद्धा स्क्रीन वापरणं शक्य होतं.
वॉटरप्रूफ पाउच नसेल, तर मोबाईलला प्लास्टिक पिशवीत ठेवा आणि झिप बंद करा.
पावसात मोबाईलचा वापर आवश्यक असल्यास करा शक्यतो टाळा. कॉल्स किंवा मेसेजसाठी ओलसर वातावरणात वापर करू नका.
मोबाईल कोरड्या खिशात किंवा वॉटरप्रूफ बॅगेच्या आत ठेवा.
कॉल्ससाठी ब्लूटूथ इयरफोन वापरल्यास मोबाईल सतत बाहेर काढण्याची गरज पडत नाही.
IP रेटिंग असलेले मोबाईल निवडा, जे थोडं भिजल्यावरही खराब होत नाहीत.
मोबाईल भिजल्यास लगेच बंद करा, कोरड्या कपड्याने पुसा, आणि तो सुकल्याशिवाय चार्ज करू नका. गंभीर समस्या आढळल्यास अधिकृत सर्व्हिस सेंटरला भेट द्या.