Anuradha Vipat
अभिनेत्री कीर्ती सुरेश लवकरच बॉयफ्रेंड अँटनी थट्टिल याच्याबरोबर लग्नबंधनात अडकणार आहे.
सध्या सोशल मीडियावर कीर्तीच्या लग्नाची पत्रिका जोरदार व्हायरल होत आहे.
कीर्ती बॉयफ्रेंडबरोबर गोव्यात पोहोचली आहे.
कीर्ती आणि अँटनीच्या मित्रमंडळींनी इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी शेअर केली आहे.
त्यामध्ये कीर्ती आणि अँटनीबरोबर अन्य काही जणांची विमान प्रवासाची तिकिटेही आहेत.
कीर्तीनेसुद्धा तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून फोटो पुन्हा स्टोरीमध्ये ठेवला आहे.
कीर्ती आणि अँटनी यांचा विवाह सोहळा १२ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.