केरळ आणि केरळम् शब्दांमध्ये काय फरक आहे?

संतोष कानडे

केरळ

केरळ राज्याचं नाव बदलून केरळम् करण्याच्या विधेयकाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

केरळम्

केरळच्या विधानसभेने दोनवेळा सर्वांच्या संमतीने हा प्रस्ताव पारित केलेला होता. मात्र या दोन शब्दांमध्ये फरक काय आहे?

मल्याळम

केरळ आणि केरळम् ही नावं एकाच राज्याची असली तरी केरळम् हे मल्याळम भाषेचं मूळ रुप आहे.

इंग्रजी

केरळ हे केरळम् शब्दाचं इंग्रजी आणि हिंदी रुप आहे. राज्यातील लोक मात्र आपल्या मूळ भाषेत केरळम् असाच उल्लेख करतात.

शिलालेख

ऐतिहासिक दस्तावेजांनुसार सम्राट अशोकाच्याही पूर्वी इ.स. पूर्व २५७ च्या शिलालेखात केरळपुत्र या शब्दाचा उल्लेख आहे.

चेरामल

दुसरीकडे केरळम् शब्दाच्या उत्पत्तीबद्दलही वेगळी मतं आहेत. एका मतानुसार याचा संबंध चेरामलाशी जोडला जातो. हा अर्थ प्राचिन चेरा राजवंशाशी जोडलेला आहे.

शब्दकोश

जर्मन तत्वज्ञ डॉ. हरमन गुंडर्ट यांनी पहिला मल्याळम्-इंग्रजी शब्दकोश तयार केला होता. त्यांनी केरळ शब्दाला चेरमचं रुप म्हटलं होतं आणि केरळम्ला त्याच्याशी जोडलेलं होतं.

नारळाचं झाड

आणखी एक मान्यता आहे की, केरळम् शब्द हा 'केरा'पासून बनलेला आहे. याचा अर्थ नारळाचं झाड असा होतो.

नारळ

केरळमध्ये नारळाच्या झाडांची संख्या मोठी आहे. त्यामुळे याला नारळाची भूमी या अर्थाने बघितलं जातं.

मुघल साम्राज्य संपण्याची पाच मोठी कारणं

<strong>येथे क्लिक करा</strong>