पुजा बोनकिले
लठ्ठपणा हा आजार नसून, काही आजारांचे लक्षण किंवा कारण आहे.
दिवसभरात खर्च होणाऱ्या शारीरिक ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जा आपल्याला अन्नातून मिळाली तर ही अतिरिक्त ऊर्जा चरबीच्या स्वरूपात शरीरात साठत जाऊन लठ्ठपणा येतो.
याची महत्त्वाची कारणे कोणती हे जाणून घेऊया.
शरीरातील थायरॉईड, पिट्युटरी यांसारख्या अंतःस्रावी ग्रंथींच्या कार्यातील बिघाडामुळे लठ्ठपणा वाढतो.
नैराश्य, खिन्नता यांसारख्या मानसिक समस्यांनी ग्रासलेल्या व्यक्तींचा अतिखाण्याकडे असलेला कल यामुळे लठ्ठपणा वाढतो.
स्त्रियांमध्ये ऋतुप्राप्ती, गर्भारपण, ऋतुसमाप्ती या काळांमध्ये होणारे बदल, तसेच अंडाशयाचे विकारामुळे लठ्ठपणा वाढतो.
स्टिरॉईड्स, इन्शुलिन, गर्भनिरोधक गोळ्यांसारखी औषधे घेतल्यास लठ्ठपणा वाढतो.
अतिपोषण, तसेच पौष्टिक आहारापेक्षा चमचमीत मसालेदार पदार्थांना, "फास्ट फूड', शीतपेयामुळे लठ्ठपणा वाढतो.
तुम्ही नियमितपणे व्यायाम न केल्यास लठ्ठपणा वाढतो.