Sandip Kapde
पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रात ३० जूनपासून पावसाचा जोर सातत्याने वाढत आहे.
Khadakwasla Dam Water Storage Update
esakal
गेल्या चार दिवसांत पाणलोट क्षेत्रात सुमारे २०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणांमध्ये पाण्याची आवक वाढली आहे.
Khadakwasla Dam Water Storage Update
esakal
अवघ्या चार दिवसांत धरणसाखळीच्या उपयुक्त पाणीसाठ्यात ०.८२० टीएमसीची भर पडली आहे.
Khadakwasla Dam Water Storage Update
esakal
३० जून रोजी ३.६३ टीएमसी असलेला उपयुक्त पाणीसाठा आता वाढून ४.४५ टीएमसीपर्यंत पोहोचला आहे.
Khadakwasla Dam Water Storage Update
esakal
सध्या धरणसाखळीत ४.४५ टीएमसी म्हणजेच १५.२६ टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
Khadakwasla Dam Water Storage Update
esakal
गतवर्षी याच दिवशी धरणसाखळीत १७.१५ टीएमसी म्हणजे ५८.८३ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.
Khadakwasla Dam Water Storage Update
esakal
यंदाचा पाणीसाठा गेल्या वर्षाच्या तुलनेत अद्याप मोठ्या प्रमाणात कमी असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होते.
Khadakwasla Dam Water Storage Update
esakal
पावसाचा वेग असाच कायम राहिल्यास येत्या काही दिवसांत धरणसाखळीतील पाणीसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Khadakwasla Dam Water Storage Update
esakal
शनिवारी सकाळी सहा वाजेपर्यंत खडकवासला धरणात ०.३० टीएमसी म्हणजेच १४.९७ टक्के पाणीसाठा नोंदविण्यात आला.
Khadakwasla Dam Water Storage Update
esakal
धरणांतील पाणीसाठा वाढत असला तरी पुणेकरांसाठी दीर्घकालीन दिलासादायक परिस्थिती निर्माण होण्यासाठी आणखी चांगल्या पावसाची आवश्यकता आहे.
Khadakwasla Dam Water Storage Update
esakal
Khadakwasla Dam pune History and Old Photos- built by Captain Fife Re of the British army