How Kattha is Made : मसाला पानाने ओठ लाल कसे होतात? पानवाल्यांच्या डब्यातील 'कात' नेमका कशापासून बनतो; जाणून घ्या 'या' काटेरी झाडाचे थक्क करणारे रहस्य

बाळकृष्ण मधाळे

मसाला पानाचा लाल रंग येतो कुठून?

मसाला पान खाल्ल्यानंतर त्याला येणारा लालसर रंग पाहून कधी विचार केलाय का, हा रंग नेमका कशामुळे येतो? यामागे आहे खैराच्या झाडापासून तयार होणारा खास पदार्थ… त्याला म्हणतात ‘कात’!

How is kattha made from khair tree

|

esakal

काटेरी खैराच्या झाडापासून तयार होतो कात

कात हा कोणत्याही कृत्रिम रंगापासून तयार होत नाही. तो पानगळीच्या आणि काटेरी खैर (Senegalia catechu) या झाडाच्या खोडातील आतील लाकडी गाभ्यापासून तयार केला जातो.

How is kattha made from khair tree

|

esakal

आयुर्वेदातही खैराला विशेष महत्त्व

आयुर्वेदात खैराला ‘खदिर’ असे नाव आहे. पारंपरिक आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये त्याचा उल्लेख त्वचाविकारांवरील औषधी वनस्पती म्हणून आढळतो. त्यातील तुरट गुणधर्मांमुळे त्याला विशेष महत्त्व आहे.

How is kattha made from khair tree

|

esakal

झाडाच्या खोडातून कसा बनतो कात?

खैराच्या खोडातील आतील गाभ्याचे लहान तुकडे किंवा चिप्स केले जातात. हे तुकडे पाण्यात अनेक तास उकळले जातात. त्यानंतर मिळालेला अर्क गाळून तो घट्ट होईपर्यंत आटवला जातो.

How is kattha made from khair tree

|

esakal

अर्क सुकवला की तयार होतो कात

खैरापासून मिळालेला घट्ट अर्क सुकवला की त्याचे रूपांतर कातामध्ये होते. हा कात पुढे पानामध्ये वापरला जातो. त्यातील नैसर्गिक घटकांमुळे पानाला लालसर रंग आणि तुरट चव मिळते.

How is kattha made from khair tree

|

esakal

भारतातील अनेक राज्यांत खैराचे उत्पादन

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, गुजरात आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये खैराचे उत्पादन होते. महाराष्ट्रातही ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, चंद्रपूर, गडचिरोली आणि नाशिकच्या जंगल परिसरात ही झाडे आढळतात.

How is kattha made from khair tree

|

esakal

दात आणि हिरड्यांसाठीही पारंपरिक वापर

आयुर्वेदात खैराच्या तुरट गुणधर्मांचा उपयोग तोंडाचे आरोग्य राखण्यासाठी पारंपरिक पद्धतीने केला जातो. तोंड येणे, हिरड्यांमधून रक्त येणे आणि घशाची खवखव यांसाठीही त्याचा उल्लेख आढळतो.

How is kattha made from khair tree

|

esakal

त्वचा आणि पचनाच्या समस्यांमध्येही उपयोग

खैराच्या सालीचा लेप खाज, खरूज आणि नायटा यांसारख्या त्वचेच्या समस्यांवरील पारंपरिक उपचारांमध्ये वापरला जातो. काताचा अल्प प्रमाणातील वापर जुलाब आणि अतिसारासाठी आयुर्वेदात सांगितला जातो. मात्र, औषधी वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावा.

How is kattha made from khair tree

|

esakal

काताचा उपयोग फक्त पानापुरता मर्यादित नाही!

खैरापासून तयार होणाऱ्या काताचे औद्योगिक उपयोगही आहेत. त्याच्या उपउत्पादनाचा वापर चामडे कमावण्यासाठी केला जातो. मासेमारीची जाळी मजबूत करणे, कापडाला तपकिरी रंग देणे यासाठीही त्याचा उपयोग होतो. खैराचे टणक लाकूड शेतीची अवजारे आणि घराचे खांब बनवण्यासाठी वापरले जाते.

How is kattha made from khair tree

|

esakal

महत्त्वाची टीप :

पानाचा लालसर रंग केवळ कातामुळेच येतो असे नाही. सुपारी, चुना आणि कात यांच्या परस्पर अभिक्रियांमुळेही लालसर रंग तयार होण्यास मदत होते. तसेच खैराच्या औषधी उपयोगांबाबतचे उल्लेख हे पारंपरिक आयुर्वेदिक संदर्भ आहेत; त्यांना सिद्ध वैद्यकीय उपचार समजू नये.

How is kattha made from khair tree

|

esakal

Railway Track Ballast : रेल्वे रुळांच्या मध्ये आणि आजूबाजूला टोकदार दगड का टाकले जातात? यामागचं 'हे' रंजक विज्ञान तुम्हाला माहिती आहे का?

Why Are Stones Placed Under Railway Tracks?

|

esakal

येथे क्लिक करा...