Anushka Tapshalkar
भारत-पाकिस्तान दरम्यानच्या तणावाच्या काळात खान सर यांनी लग्न केले होते. त्यांचे रिसेप्शन 2 जूनला पटण्यात पार पडले.
या रिसेप्शनमध्ये खान सर यांच्या पत्नीने लाल कढाईदार लेहेंगा परिधान केला होता आणि चेहऱ्यावर लाल घुंगट (ओढणी) घेतली होती.
या कार्यक्रमाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. काही जण त्यांच्या साधेपणाचं कौतुक करत आहेत तर काहीजण त्यांच्या लूकवर खास करून घुंगट (ओढणी)वर प्रश्न विचारत आहेत.
हा प्रश्न अनेकांना पडतो. हिजाब, नकाब, बुर्का हे मुस्लिम महिलांचे पारंपरिक वस्त्रप्रकार आहेत, जे चेहरा झाकण्यासाठी वापरले जातात. परंतु खान सरांच्या पत्नीच्या लूकनंतर अनेकांना हा प्रश्न पडला आहे.
इतिहास पाहिल्यास, भारतात पूर्वीपासूनच पर्दा प्रथा होती. पण मुस्लिम शासक भारतात आल्यावर हिंदूंमध्येही घुंगटची परंपरा वाढली.
हिजाब आणि घुंगट यामध्ये साम्य आहे. दोन्ही स्त्रियांनी चेहरा झाकण्यासाठी घेतले जातात. पण धार्मिक आणि सामाजिक कारणं वेगळी असतात.
विशेषतः भारत आणि पाकिस्तानमध्ये मुस्लिम विवाहांमध्ये नववधू घुंगट घेताना दिसते. तो पारंपरिकतेचा एक भाग मानला जातो.
घुंगटला विविध नावांनी ओळखले जाते. जसे घुंघटा, घोमटा, ओरहनी, ओढणी. हे प्रादेशिक भाषेनुसार बदलते.
घुंगट ही सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक बाब असून त्यावर वेळोवेळी चर्चा आणि मतभेद होत असतात.