संतोष कानडे
आठराव्या शतकात महाराष्ट्रातील दाभाडे घराणं हे प्रसिद्ध होतं. घराण्याचे मूळ पुरुष बजाजी हे पुण्यातल्या तळेगावचे पाटील होते.
खंडोजी दाभाडे आणि शिवाजी दाभाडे या दोघा बंधूंनी राजाराम महाराजांचं रक्षण करत पराक्रम गाजवला होता.
जिंजीहून माघारी येताना छत्रपतींचा कबिला खंडेराव दाभाडे यांनी यशस्वीपणे पन्हाळ्यास पोहोचविला होता. त्यामुळे त्यांना मोठी बक्षिसी मिळाली.
राजाराम महाराजांनंतर शंभूपुत्र शाहू महाराज मोघलांच्या कैदेतून महराष्ट्रात परत आले. तेव्हा खंडेराव दाभाडे त्यांच्या आश्रयाला गेले.
पुढे खंडेराव दाभाडे हे सरसेनापती झाले. मुघलांचा दख्खनचा सुभेदार हुसेनअल्ली याच्याविरुद्धची मोहीम शाहू महाराजांनी खंडेराव दाभाडेंवर सोपवली.
दाभाडेंनी गुजरातवर स्वाऱ्या केल्या हुसेनला जेरीस आणले. त्याने झुल्फिकारबेग याला मरठ्यांवर हल्ल करण्यास धाडले.
परंतु लढऊ खंडेरावांनी झुल्फिकार खानाची सगळी फौज कापून काढली. पुढे खान्देश, वऱ्हाड, गुजरात या तिन्ही प्रांतावर नजर ठेवण्याचं काम खंडेरावांनी केलं.
खंडेराव दाभाडे यांनी वसई ते सुरतपर्यंत कोंकण काबीज केले होते. त्यांनीच गुजरातमध्ये मराठ्यांचा दबदबा निर्माण केला.
मुघलाचा गुजरातमधील दबदबा खंडेराव दाभाडेंनी मोडून काढला. त्यामुळे शाहू महराजांनी त्यांचं अनेकवेळा कौतुक केलं होतं.