औरंगजेब मराठ्यांना घाबरायचा; त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण

संतोष कानडे

इंग्रज

इंग्रज सुरुवातीला व्यापारासाठी भारतात आले. पुढे ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. मात्र, कंपनीच्या अरेरावीला कंटाळून इंग्लंडमध्ये ‘न्यू इंग्लिश कंपनी’ची स्थापना झाली.

दोन्ही कंपन्यांमध्ये संघर्ष

नवीन कंपनीला भारतात प्रवेश मिळावा म्हणून इंग्लंडच्या राजाने ‘सर विल्यम नॉरिस’ याला मुघल बादशाह औरंगजेबाकडे वकील म्हणून पाठवले.

नॉरिसची वकिली फसली

दोन्ही इंग्रजी कंपन्या एकत्र झाल्यामुळे नॉरिसची वकिली निरर्थक ठरली, पण त्याने प्रवासात केलेली दैनंदिनी पुढे ऐतिहासिक ठरली.

मराठ्यांचा धडाका आणि औरंगजेब

१७०१ मध्ये नॉरिस शहागड येथे पोहोचला. तिथे मराठ्यांनी मोठा हल्ला केला होता. नॉरिसने लिहिलं – "मोठे मुघल अधिकारीही मराठ्यांमुळे प्रवास करताना घाबरतात."

मराठ्यांचा दबदबा

मराठ्यांचा प्रभाव एवढा होता की मुघल सत्ताधारीही असुरक्षित वाटू लागले होते. हे नॉरिसच्या निरीक्षणातून स्पष्ट होते.

औरंगजेबाची पन्हाळगड मोहीम

औरंगजेब सातार्‍यावर विजय मिळवण्यासाठी ब्रम्हपुरीहून मिरजमार्गे पन्हाळगडाकडे निघाला होता.

नॉरिसचा पाठलाग

नॉरिस बादशहाच्या मागोमाग मिरजेस २७ मार्च १७०१ रोजी पोहोचला. औरंगजेब नुकताच तिथे राहून गेला होता.

हास्यस्पद खंदक

औरंगजेबाच्या छावणीभोवती खणलेला ‘खंदक’ पाहून नॉरिसने उपहास केला – “हा खंदक सहा-सात वर्षांचे मुलही सहज पार करू शकतील!”

मराठ्यांची भीती आणि मुघलांची असहाय्यता

ही दैनंदिनी मराठ्यांचा दबदबा, मुघलांची असुरक्षितता आणि इंग्रजांचा निरीक्षक दृष्टिकोन स्पष्टपणे दाखवते.

महिलांच्या अंतर्वस्त्रावरुन औरंगजेबने लावला होता नियम

<strong>येथे क्लिक करा</strong>