Aarti Badade
पुण्यातील लकडी पूल ओलांडल्यावर खंडुजीबाबा चौक लागतो. हे ठिकाण खूप ऐतिहासिक आणि भक्तिमय आहे.
संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीत, हैबतबाबांसोबत खंडुजीबाबा जेवणाची व्यवस्था पाहत असत.
आजही वारीमध्ये खंडुजीबाबांची दिंडी माऊलींच्या रथामागे दुसऱ्या क्रमांकावर असते. हे त्यांचे मानाचे स्थान आहे.
या चौकात खंडुजीबाबांची समाधी आणि त्यांचे विठ्ठल मंदिर आहे. उजव्या बाजूला एक फलकही दिसतो.
मंदिराच्या दारातून आत गेल्यावर १५-२० पायऱ्या उतरावे लागतात. त्यानंतर एक मोठे मंदिर दिसते.
२९ डिसेंबर १९८२ रोजी दत्त जयंतीच्या दिवशी मंदिरात दत्तमूर्तीची स्थापना झाली.
नामदेव देवजी बढे यांनी आपल्या आई-वडिलांच्या आठवणीत गाभाऱ्याचे बांधकाम केले. पाटोळे कुटुंबाने मूर्तींची स्थापना केली.
१९६१ च्या पानशेत पुरात विठ्ठल मंदिर वाहून गेले. पण खंडुजीबाबांची समाधी मात्र वाचली.
२५ ऑगस्ट १९७२ रोजी नवीन विठ्ठल-रखुमाई मूर्तींची स्थापना पुन्हा करण्यात आली.
मंदिराच्या गाभाऱ्यात सुंदर काळ्या दगडातील विठ्ठल-रखुमाईच्या मूर्ती आहेत. पायाशी खंडुजीबाबांची समाधी आणि एक मोठा सभामंडप आहे.