सकाळ डिजिटल टीम
कोयरी ही रानवेलीवर येणारी शेंग असते. मराठीत हिला खाजकुयरी, विदर्भात काचकुयरी तर आयुर्वेदात कपिकच्छू असे म्हटले जाते.
कोयरीला विविध नावांनी ओळखले जाते – कवच, आत्मगुप्ता, क्रौंच, वानरी, गुहिरी, कुयली, रोमवल्ली, दुःस्पर्शा इ.
ही वनस्पती वात, कफ आणि पित्त कमी करण्यासाठी आयुर्वेदिक औषधांमध्ये वापरली जाते. शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते.
कोवळ्या शेंगांचे वाफवून मसालेदार वाटणात शिजवलेले स्वादिष्ट कोयरीचे भाजीपान, एकदा खाल्लं की विसरता येत नाही!
कोयरीचे बीज कामोत्तेजक मानले जाते. आयुर्वेदात याचा वापर पुरुषांमध्ये ताकद वाढवण्यासाठी होतो.
कोयरीमुळे शरीराला नैसर्गिक ऊर्जा मिळते. मानसिक आणि शारीरिक थकवा दूर होतो.
तणाव कमी करून स्मरणशक्ती वाढवण्यासाठी कोयरी उपयुक्त आहे. ही नर्व्ह टॉनिक म्हणूनही ओळखली जाते.
या वेलीवर शरद ऋतूत सुंदर जांभळ्या रंगाची फुले फुलतात. ही निसर्गाची देणगी दिसायलाही सुंदर वाटते.