सकाळ डिजिटल टीम
खेलरत्न पुरस्काराला आधी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असे म्हटले जायचे.
२०२१ मध्ये या पुरस्काराचे नाव 'मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार' असे करण्यात आले.
१९९१-९२ पासून हा पुरस्कार देण्यास सुरूवात झाली.
खेळामध्ये विषेश कामगिरी करणाऱ्या व यश संपादन करणाऱ्या खेळाडूला हा पुरस्कार देण्यात येतो.
या पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड करण्यासाठी निवड समिती नेमण्यात आली आहे.
समिती खेळाडूंच्या मागिल ४ वर्षांतील कामगिरीचे मूल्यांकन करून खेळाडूंची निवड करते.
क्रिकेट, ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक, आशिआई स्पर्धेंमधील व इतर अनेक खेळातील खेळाडूंसाठी हा पुरस्कार देण्यात येतो.
सर्वात पहिला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद यांना देण्यात आला होता.
खेलरत्न पुरस्कार जाहीर झालेल्या खेळाडूला एक मेडल, एक प्रमाणपत्र व २५ लाख रूपये बक्षिस देण्यात येते.