Sandip Kapde
सतीश भोसले, ज्याला 'खोक्या' म्हणून ओळखलं जातं.
हा भाजपा आमदार सुरेश धस यांचा कट्टर समर्थक आहे.
स्थानिक पातळीवर त्याला गोल्डमॅन म्हणूनही ओळखतात, कारण तो सतत सोन्याचे दागिने घालून फिरतो.
शिरुर कासार परिसरात खोक्याची मोठी दहशत असून, तिथे त्याची स्वतःची 'खोक्या पार्टी' आहे.
व्हिआयपी गाड्या, सोन्याचे ब्रेसलेट आणि गळ्यातील जाडसर माळ यामुळे तो श्रीमंती आयुष्य जगतो.
त्याचा हेलिकॉप्टरमधून उतरण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे
दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये तो कारमधून नोटा उधळताना दिसत आहे, ज्यामुळे तो चर्चेत आला.
खोक्या भोसलेची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून, त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.
मागील सहा-सात वर्षांपासून तो राजकारणात सक्रिय असून, बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ओळख मिळवत आहे.
शिरुर शहराजवळील पारधी वस्तीत राहणारा खोक्या अनेक लोकांना आपल्या गटात सामील करतो
त्याच्या भोवती नेहमीच लोकांचा गराडा असतो, त्यामुळे तो सतत चर्चेत राहतो.
लहानपणापासूनच शिकार करण्याची सवय असल्याने त्याने अनेक प्राण्यांची अवैध शिकार केली आहे.
बीड पोलिसांनी त्याच्या घरावर छापा टाकला असता गांजा आणि इतर अमली पदार्थ आढळले
त्याच्यावर तीन गंभीर गुन्हे दाखल असून, त्याच्या वाढत्या प्रभावामुळे तो राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा बनत आहे.
खोक्याने स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी अनेक स्थानिक गुंडांना आपल्या गटात घेतले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि दरारा यामुळे खोक्या यामुळं त्याचं खोक्या टोपणनाव पडलं.
सतीश भोसले उर्फ खोक्या याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे