Payal Naik
मराठी मालिका 'सारं काही तिच्यासाठी' मध्ये आता मोठा बदल झाला आहे.
मालिकेतील मुख्य अभिनेत्रीने मालिकेचा निरोप घेतला आहे.
मालिकेतील उमा म्हणजे अभिनेत्री खुशबू तावडे हिने मालिकेचा निरोप घेतला आहे.
खुशबू तावडे गरोदर असून ती लवकरच तिच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे.
खुशबू सध्या आठ महिन्यांची गरोदर आहे. तरीही मालिकेचं शूटिंग करत आहे.
आता तिने तिचे शेवटचे काही भाग शूट केले आणि मालिकेचा निरोप घेतला.
आता मालिकेत तिच्याजागी पल्लवी वैद्य दिसणार आहे.
पल्लवीने 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेत पुतळा बाईसाहेबांची भूमिका साकारली होती.