Mayur Ratnaparkhe
टीव्ही अभिनेत्री खुशी मुखर्जीने भारतीय क्रिकेट संघाचा टी-२० कर्णधार सूर्यकुमार यादवबद्दल एक खळबळजनक विधान केलं आहे.
खुशीने सूर्यकुमार यादव मला नेहमी मेसेज करायचा, मात्र आता आम्ही बोलत नाही असा दावा केला आहे.
कोलकाता येथे जन्मलेली खुशी २९ वर्षांची आहे आणि अनेक वर्षांपासून टीव्ही इंडस्ट्रीचा भाग आहे.
तिने २०१३ मध्ये "अंजली थुराई" या तमिळ चित्रपटातून तिच्या कारकिर्दीची सुरुवात केली.
तिने तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
पण तिला भारतीय टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शोद्वारे खरी ओळख मिळाली.
एमटीव्हीच्या "स्प्लिट्सव्हिला १०" आणि "लव्ह स्कूल ३" मध्ये भाग घेतल्यानंतर ती खूप लोकप्रिय झाली
सोशल मीडियावर तिच्या पेहरावांमुळे चर्चेत असणाऱ्या खुशीने केलेल्या दाव्याने सर्वांना धक्का दिला आहे.
यापूर्वी खुशीने सांगितले होते की तिच्या मैत्रांनी तिला गुंगीचे औषध दिले होते आणि तिच्या घरातून मौल्यवान वस्तू चोरल्या होत्या.
Mobile Charger Black and White Color
esakal