सकाळ डिजिटल टीम
खसखस दिसायला लहान अलसी तरी तीचे अनेक गुणकारी फायदे आहेत. यात कोण-कोणती पोषक तत्वे असतात जाणून घ्या.
खसखसमध्ये असलेले अल्कलॉइड्स आणि मॅग्नेशियम हे घटक शांत झोप लागण्यास मदत करतात. झोप न लागण्याच्या (निद्रानाश) समस्येवर हा एक प्रभावी नैसर्गिक उपाय ठरू शकते.
खसखसमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते, जे हाडे आणि दातांसाठी आवश्यक आहेत. याचे नियमित सेवन केल्याने ऑस्टिओपोरोसिससारख्या हाडांच्या आजारांचा धोका कमी होतो.
खसखसमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असल्यामुळे ते पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) आणि इतर पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
यामध्ये ओमेगा-६ फॅटी ऍसिड आणि असंतृप्त फॅटी ऍसिड असल्याने ते कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. यामुळे हृदयविकारांचा धोका कमी होतो.
खसखसमध्ये कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन असल्याने ते शरीराला ऊर्जा देतात. दिवसाची सुरुवात खसखस खाऊन केल्यास दिवसभर उत्साह टिकून राहतो.
खसखसमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला निरोगी ठेवतात. तसेच, त्यात लिनोलिक ऍसिड असल्याने त्वचा मॉइश्चराइज्ड राहते आणि त्वचेला चमक येते.
खसखसमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. उच्च रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांसाठी हे फायदेशीर ठरू शकते.
खसखसचा उपयोग पारंपरिक औषधांमध्ये वेदना कमी करण्यासाठी केला जातो. डोकेदुखी किंवा शरीरातील इतर वेदनांवर हा एक नैसर्गिक उपाय मानला जातो.