Apurva Kulkarni
मनोरंजन विश्वात 'मेट गाला' सोहळ्याची जोरदार चर्चा सुरुये. या सोहळ्यात खास आकर्षण ठरली कियारा आडवाणी.
मेट गालामध्ये कियारा अडवाणीची ड्रेसची चर्चा खूप रंगली. तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताय.
मेटा गालामध्ये कियाराच्या बेबी बंपने सर्वांचं लक्ष वेधलं. या सोहळ्यातच तिने बेबी बंपचे फोटो पहिल्यांदा चाहत्यांसोबत शेअर केले.
कियाराने खास डिझाईन केलेल्या ड्रेसचं नाव 'ब्रेव्हहार्ट्स' असं नाव होतं.
कियाराच्या ड्रेसची किंमत तब्बल 30 हजार डॉलर म्हणजेच 33 लाख 68 हजार 846 रुपये इतकी आहे.
कियाराने काळ्या रंगाचा सोनेरी नक्षीकाम केलेला एक सुंदर ड्रेस बनवून घेतला होता.
तिच्या पोटावर एक हार्ट सुद्धा काढण्यात आलं होतं.
एक आई आणि दुसरं बाळाचे असे दोन हृदय नाभीसंबंधीच्या दोरीला जोडलेली साखळी तिच्या ड्रेसद्वारे दाखवण्यात आली होती.