Saisimran Ghashi
किडनी कर्करोगाला 'सायलेंट किलर' म्हटले जाते कारण सुरुवातीस त्याची लक्षणे दिसत नाहीत.
हा आजार उशिरा समजतो आणि त्यामुळे वेळेत उपचार करणे कठीण होते.
उच्च रक्तदाब, वारंवार स्टोन होणे आणि धूम्रपान ही किडनी कॅन्सरची प्रमुख कारणे आहेत.
लघवीत रक्त येणे, पोटदुखी, वजन कमी होणे आणि थकवा ही संभाव्य लक्षणे आहेत.
मूत्रपिंड शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो, त्यामुळे त्याचे आरोग्य जपणे अत्यावश्यक आहे.
उपचारांसाठी सोनोग्राफी, सीटी स्कॅन आणि कधी कधी पीईटी स्कॅन आवश्यक ठरतात.
किडनी कॅन्सर सहसा वयस्कांमध्ये आढळतो, पण कमी वयातही शक्यता नाकारता येत नाही.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.