किडनी फेल्युअरचा वाढता धोका! CKD कसं हळूहळू शरीरावर ताबा मिळवतं?

Aarti Badade

मूत्रपिंडाचे (किडनीचे) कार्य

मूत्रपिंड (Kidney) हा शरीरातील अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे, जो रक्तातील विषारी (Toxins) पदार्थ बाहेर टाकण्याचे सातत्याने काम करतो.

Chronic Kidney Disease (CKD)

|

Sakal

वाढत्या विकाराचे गांभीर्य

दीर्घ मूत्रपिंड विकार (CKD) हा जगात वेगाने वाढणारा आजार आहे. भारतात सुमारे १०% लोकांमध्ये हा आजार आढळतो.

Chronic Kidney Disease (CKD)

|

Sakal

उशिरा दिसणारी लक्षणे

किडनी निकामी होण्याची लक्षणे खूप उशिरा दिसतात. जेव्हा लक्षात येते, तेव्हा आजाराने बरेच नुकसान केलेले असते.

Chronic Kidney Disease (CKD)

|

Sakal

किडनी निकामीची मुख्य कारणे

१. मधुमेह (४०%), २. उच्च रक्तदाब (३०%), ३. निकृष्ट आहार/लठ्ठपणा आणि ४. वेदनाशामक गोळ्यांचा (Painkillers) अनिर्बंध वापर ही मुख्य कारणे आहेत.

Chronic Kidney Disease (CKD)

|

Sakal

सुरुवातीची लक्षणे

थकवा, पाय किंवा घोटे सुजणे, रात्री वारंवार लघवी, फेसाळ लघवी (Proteinuria) आणि उच्च रक्तदाब ही सुरुवातीची लक्षणे आहेत.

Chronic Kidney Disease (CKD)

|

Sakal

गंभीर लक्षणे

तीव्र सूज, दम लागणे, भूक मंदावणे, अंगाला खाज, लघवी कमी होणे—ही गंभीर लक्षणे दिसल्यास लगेच डॉक्टरांना भेटा.

Chronic Kidney Disease (CKD)

|

Sakal

बचावाचा पहिला उपाय: नियंत्रण

मधुमेह आणि उच्च रक्तदाब (Blood Pressure) नियंत्रणात ठेवा. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही वेदनाशामक गोळ्या घेऊ नका.

Chronic Kidney Disease (CKD)

|

Sakal

बचावाचा दुसरा उपाय: जीवनशैली

पुरेसे पाणी प्या (दिवसातून १०-१२ ग्लास). तेल, मीठ आणि साखर कमी करा. नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रणात ठेवा.

Chronic Kidney Disease (CKD)

|

Sakal

नियमित स्क्रिनिंग

मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा कुटुंबात किडनीचा आजार असल्यास नियमित स्क्रीनिंग (Serum Creatinine, Albumin-Creatinine Ratio) करून वेळेवर निदान करा.

Chronic Kidney Disease (CKD)

|

Sakal

थंडी वाढली की सांधेदुखी का वाढते? कारण जाणून घ्या आणि वेदना कमी करा!

Sakal

येथे क्लिक करा