उन्हाळ्यातच किडनीची 'ही' समस्या का वाढते? जाणून घ्या कारणे!

Aarti Badade

उन्हाळा आणि डिहायड्रेशनचा परिणाम

उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे लघवी घट्ट आणि आम्लधर्मी होते, ज्यामुळे किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो.

Kidney stone symptoms in summer

|

Sakal

शरीरातील टाकाऊ पदार्थांचे संचयन

पाणी कमी पिल्याने मूत्रपिंडातील टाकाऊ पदार्थ बाहेर न पडता तिथेच साचू लागतात आणि त्याचे रूपांतर मूतखड्यामध्ये होते.

Kidney stone symptoms in summer

|

Sakal

किडनी स्टोनची सुरुवातीची लक्षणे

लघवी करताना जळजळ होणे, पोटात किंवा पाठीत तीव्र वेदना होणे आणि तापासोबत लघवीतून रक्त येणे ही स्टोनची प्रमुख लक्षणे आहेत.

Kidney stone symptoms in summer

|

Sakal

कॅल्शियम ऑक्झॅलेटचा धोका

बहुतेक किडनी स्टोन हे कॅल्शियम ऑक्झॅलेटचे बनलेले असतात, ज्यांची धारदार रचना मूत्रमार्गाला इजा करून रक्तस्त्राव घडवू शकते.

Kidney stone symptoms in summer

|

Sakal

लहान मुलांमध्येही वाढतेय प्रमाण

आश्चर्यकारक म्हणजे खराब जीवनशैली आणि डिहायड्रेशनमुळे आता ५-६ वर्षांच्या लहान मुलांमध्येही किडनी स्टोनची प्रकरणे आढळत आहेत.

Kidney stone symptoms in summer

|

Sakal

टाळा 'या' अहितकारक सवयी

प्रिझर्व्हेटिव्हयुक्त जंक फूड, पॅकेज्ड फूड आणि कार्बोनेटेड पेयांचे अतिसेवन किडनी स्टोनच्या समस्येला अधिक गंभीर बनवते.

Kidney stone symptoms in summer

|

Sakal

बचावासाठी तज्ज्ञांचा मोलाचा सल्ला

दिवसातून किमान ३-४ लिटर पाणी प्या आणि आहारात काकडी, टरबूज यांसारख्या पाणीदार फळांचा आवर्जून समावेश करा.

Kidney stone symptoms in summer

|

Sakal

दारू न पिता देखील लिव्हर कसे निकामी होते? जाणून घ्या ‘ही’ धक्कादायक कारणे!

Non-Alcoholic Fatty Liver Disease

|

Sakal

येथे क्लिक करा