किडनी स्टोनचा त्रास आहे? मग 'हे' पदार्थ खाणे टाळा

Monika Shinde

किडनी स्टोन

भारतात किडनी स्टोनचा (मुतखडा) त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. जर तुम्हालाही याचा त्रास होत असेल, तर काही विशिष्ट पदार्थ खाणं तात्काळ बंद करणं गरजेचं आहे.

किडनी स्टोन का होतो?

शरीरात कॅल्शियम, ऑक्सलेट आणि युरिक अ‍ॅसिडचं प्रमाण वाढल्यामुळे किडनी स्टोन तयार होतो. यासोबतच पाणी कमी प्यायल्यास, सतत फास्ट फूड खाल्ल्यास आणि शरीर डिहायड्रेट झाल्यास ही समस्या उद्भवते.

कोणते पदार्थ टाळावेत?

किडनी स्टोन असताना काही विशिष्ट पदार्थ खाणं टाळणं आवश्यक आहे. हे पदार्थ खाल्ल्यास स्टोन कमी होण्याऐवजी अधिक वाढू शकतो.

टोमॅटो

टोमॅटोमध्ये ऑक्सलेटचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी याचं सेवन मर्यादित करावं.

पालक

पालक आरोग्यासाठी चांगला मानला जातो, पण यामध्येही ऑक्सलेट भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे ज्यांना स्टोनचा त्रास आहे त्यांनी पालक जास्त खाणं टाळावं.

चहा / कॉफी

कॅफिनयुक्त पेय म्हणजे चहा आणि कॉफी यामुळे शरीरात डिहायड्रेशन होऊ शकतं, जे किडनी स्टोनच्या वाढीस कारणीभूत ठरू शकतं.

फास्ट फूड आणि पॅकेज्ड स्नॅक्स

या पदार्थांमध्ये मीठ, साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज खूप जास्त प्रमाणात असतात, जे किडनीवर अतिरिक्त ताण आणतात आणि स्टोनची स्थिती गंभीर करू शकतात.

पोटात सतत दुखतंय? ही असू शकतात 'या' 3 आजारांची लक्षणे दुर्लक्ष करू नका

येथे क्लिक करा