Aarti Badade
पानफुटी ही एक आयुर्वेदिक वनस्पती असून तिची पाने औषधी गुणांनी भरलेली आहेत. ही पाने अनेक शारीरिक तक्रारींवर उपयुक्त मानली जातात.
दररोज २–३ पानफुटी पाने चावून खाल्ल्यास मूत्रपिंडातील मूतखडे नैसर्गिकरित्या निघून जातात, असं आचार्य बाळकृष्ण सांगतात.
फक्त मूतखडे काढून टाकत नाही, तर मूतखडे तयार होण्यामागची कारणंही पानफुटी मूळापासून दूर करतो.
अपचन, गॅस, पोट फुगणे यावर ही पाने रामबाण उपाय ठरतात. पचनक्रिया सशक्त होते.
दररोज याचे सेवन केल्यास शरीराची इम्युनिटी (रोगप्रतिकारक शक्ती) वाढते आणि संसर्गापासून संरक्षण मिळते.
पाने वाटून तयार केलेली पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास मुरुम व त्वचेच्या त्रासांपासून आराम मिळतो.
पाने गरम करून त्यावर तेल लावून फुगलेल्या किंवा दुखत असलेल्या भागावर बांधल्यास सूज व वेदना कमी होतात.
दररोज २–३ पाने खाल्ल्यास उच्च रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते.
ही माहिती सामान्य आरोग्यजाणकारीसाठी आहे. वापरण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला अवश्य घ्या.