Aarti Badade
किडनीला सूज येणे म्हणजे मूत्रपिंडात अतिरिक्त द्रव जमा होणे. यावर वेळीच उपचार आवश्यक आहे, कारण यामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते.
बॅक्टेरियामुळे होणारा मूत्रमार्गाचा संसर्ग किडनीपर्यंत पोहोचल्यास सूज येऊ शकते.
मूत्रपिंडातील खडे मूत्रमार्गात अडकल्यास लघवी बाहेर पडण्यास अडथळा येतो आणि त्यामुळे किडनीला सूज येते.
कर्करोगाच्या पेशींच्या वाढीमुळे देखील मूत्रपिंडात सूज येऊ शकते.
अनियंत्रित उच्च रक्तदाबामुळे किडनीला नुकसान होऊन सूज येण्याची शक्यता असते.
मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये किडनीच्या कार्यावर परिणाम होऊन सूज येऊ शकते.
काहीवेळा गरोदरपणात गर्भाशयाच्या वाढलेल्या आकारामुळे किडनीवर दबाव येऊन सूज येऊ शकते.
अपघात किंवा इतर कारणांमुळे किडनीला दुखापत झाल्यास सूज येऊ शकते.
काहीवेळा, मूत्रपिंडाच्या संरचनेतील जन्मजात दोषामुळे सूज येऊ शकते.