सूरज यादव
उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन चीन दौऱ्यासाठी बिजिंगला रवाना झालेत. विमानाऐवजी ते खास आणि सर्वाधिक सुरक्षित अशा ट्रेननेच जात आहेत.
किम जोंग उन जेव्हा कोणत्याही इतर देशाचा दौरा करतात तेव्हा ते ट्रेननेच जातात. सर्वात सुरक्षित आणि गुप्त अशा या ट्रेनमध्ये १० ते १५ डबे असतात.
एखाद्या अभेद्य किल्ल्यासारखी असलेली ट्रेन बुलेटप्रुफ आहे. बॉम्ब हल्ल्यातही यामधून प्रवास करणारे सुखरूप राहू शकतात.
हिरव्या रंगाच्या या ट्रेनमध्ये अनेक अद्ययावत शस्त्रेही आहेत. वेळप्रसंगी, गरज पडली तर त्यांचा वापर करता यावा अशी ट्रेनची रचना करण्यात आलीय.
किम जोंग उन यांच्यासह कमांडोंचे पथक यातून प्रवास करते. त्यांच्यासाठी खाद्यपदार्थ, इतर आवश्यक वस्तू ट्रेनमध्ये उपलब्ध असतात.
ट्रेनमध्ये महत्त्वाच्या व्यक्तींसोबत बैठकीसाठी मिटींग रूम आहे. यात हायटेक कम्युनिकेशन सिस्टिम लावण्यात आलीय. ट्रेनमध्ये डॉक्टरांचं एक पथकही तैनात असतं.
एखाद्या ठिकाणी दौऱ्यावर जाण्यासाठी किम जोंग उन याच ट्रेनने प्रवास करतात. तिथून पुढच्या प्रवासासाठी त्यांच्या दोन आलिशान मर्सिडीज कारही या ट्रेनमध्ये असतात.
किम जोंग यांची ट्रेन इतर देशांमध्ये जाते तेव्हा तिची चाके बदलली जातात. कारण काही देशांमध्ये ट्रॅक वेगळ्या आकाराचा असतो.
चीनमध्ये ही ट्रेन पोहोचताच वेगळं इंजिन लावलं जातं. तिथे प्रतीतास ८० किमी वेगाने ट्रेन धावते. तर उत्तर कोरियात मात्र या ट्रेनचा वेग ४५ किमी प्रतितास इतकाच असतो.