Pranali Kodre
भारताचे महिला आणि पुरुष क्रिकेट संघ जून ते ऑगस्ट दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर आहेत.
याचदरम्यान १५ जुलै रोजी लंडनमधील क्लेरन्स हाऊस येथे भारतीय पुरुष आणि महिला क्रिकेट संघांनी किंग चार्ल्स तृतीय यांची भेट घेतली.
या भेटीसाठी दोन्ही भारतीय संघातील सर्व खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ सदस्य उपस्थित होते. तसेच बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला आणि सचिव देवजित सैकिया देखील यावेळी हजर होते.
किंग चार्ल्स यांनी दोन्ही भारतीय संघाशी मोकळेपणाने संवाद साधला.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या कसोटीच्या हायलाईट्स पाहिल्याचंही किंग चार्ल्स यांनी सांगितलं.
किंग चार्ल्स यांनी मोहम्मद सिराज दुर्दैवाने ‘चेंडू फिरून स्टंपवर लागला’ म्हणून बाद झाला हे विशेष नमूद केलं.
भारतीय पुरुष कसोटी संघाचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला, “किंग चार्ल्स यांची भेट घेणं एक अद्भुत अनुभव होता. त्यांनी आमच्याशी खूप चांगला संवाद साधला.”