Anuradha Vipat
नीट वादात उडी घेत किरण माने यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला.
आधी पेपरफुटी आणि त्यानंतर अचानक रद्द केलेली पीजी परीक्षा यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून मोठा संताप व्यक्त केला जात आहे
किरण मानेंनी सोशल मीडिया पोस्ट करत म्हटलं की, केंद्रात कशीबशी सत्ता आली म्हणून कितीही टणाटणा उड्या मारूद्यात... या टग्यांना महाराष्ट्रात ठाकरे, पवारांची आणि देशात राहुल गांधींची जबरदस्त दहशत बसलेली आहे.
पुढे किरण मानेंनी पोस्टमध्ये म्हटलं की, इलेक्शन कमिशनपास्नं इव्हीएमपर्यन्त सगळे हाताशी घेऊनही जनतेनं लाथ घातल्यामुळे या हुकूमशहांचा माज ठेचला गेलाय.
एरवी, मणिपूर धिंड आणि कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्यांकडे माजोरडेपणानं डोळेझाक करणारे हे दगडाच्या काळजाचे लोक... असंही किरण मानेंनी म्हटलं आहे
पुढे किरण मानेंनी पोस्टमध्ये म्हटलं की, NEET परीक्षेमधल्या घोटाळ्याला या कोडग्यांनी भिकसुद्धा घातली नसती. उडवुन लावलं असतं. पण केंद्रात कुबड्या घेऊन सत्तेत आलेत. न ऐकून सांगतायत कुणाला??
विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत झालेलं नुकसान कोण भरुन देणार?असंही सवाल यावेळी किरण मानेंनी केला आहे