Aarti Badade
आजकाल कोलेस्ट्रॉलची समस्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. चुकीचा आहार हे याचे मुख्य कारण आहे. पण किचनमध्येच यावर एक नैसर्गिक रामबाण उपाय उपलब्ध आहे!
sakal
भोपळ्याच्या बिया (Pumpkin Seeds) हृदयासाठी उपयुक्त फॅट्स, फायबर, अँटिऑक्सिडंट्स आणि मिनरल्सनी भरलेल्या असतात. त्या कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात.
Sakal
या बियांमध्ये असलेले फायटोस्टेरॉल्स (Phytosterols) कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करतात. त्यामुळे LDL (वाईट कोलेस्ट्रॉल) कमी होऊन HDL (चांगले कोलेस्ट्रॉल) वाढते.
Sakal
ओमेगा-६ आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स रक्तवाहिन्यांमधील प्लाक (Plaque) जमण्याची शक्यता कमी करतात. यामुळे रक्तवाहिन्या मजबूत होतात.
sakal
भोपळ्याच्या बियांमध्ये असलेले मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. तसेच, ते रक्तवाहिन्यांची लवचिकता (Elasticity) टिकवून ठेवते.
Sakal
व्हिटॅमिन ई, कॅरोटिनॉइड्स आणि पॉलीफिनॉल्स सारखे अँटिऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांचे नुकसान टाळतात आणि सूज (Inflammation) कमी करून हृदयाचे रक्षण करतात.
Sakal
दररोज भोपळ्याच्या बिया खाल्ल्याने हृदय अधिक निरोगी राहते आणि औषधांशिवाय कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. या बिया तुमच्या हृदयासाठी नैसर्गिक ढाल आहेत.
Sakal
Sakal