Aarti Badade
तुम्ही कधी विचार केला आहे का, की दिवसभर आपण ज्या गोष्टींचा विचार करतो, त्या स्वप्नात (Dreams) का दिसतात? यामागे आपले मन आणि मेंदूचे कार्य दडलेले आहे.
Sakal
दिवसभर तुम्ही ज्या गोष्टींचा सखोल विचार करता, त्या तुमच्या अवचेतन मनात (Subconscious Mind) साठवल्या जातात. हे मन त्या माहितीवर प्रक्रिया करते.
Sakal
झोपेत असताना, विशेषतः REM (Rapid Eye Movement) झोपेच्या टप्प्यात, मेंदू या माहितीला, आठवणींना आणि भावनांना एकत्र करून स्वप्नांच्या स्वरूपात प्रदर्शित करतो.
Sakal
स्वप्ने आपल्याला आपल्या भावना आणि चिंतांवर प्रक्रिया करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, जर नात्यात तणाव असेल, तर ती स्वप्नात भांडणाच्या रूपात दिसू शकते.
Sakal
काहीवेळा स्वप्ने आपल्याला जीवनातील आव्हानांना तोंड देण्यासाठी किंवा समस्येचा सामना करण्यासाठी मानसिक तयारी करण्याचा एक मार्ग देतात.
Sakal
दिवसभरात मिळालेली माहिती आणि अनुभव एकत्रित करून त्यावर प्रक्रिया करण्यासाठी मेंदू स्वप्नांचा वापर करतो. यामुळेच स्वप्नांमध्ये दिवसभराच्या घटनांचा समावेश असतो.
Sakal
थोडक्यात, आपले स्वप्न म्हणजे दुसरे काही नसून, अवचेतन मनाने दिवसभर जमा केलेल्या विचारांवर आणि भावनांवर केलेली प्रक्रिया असते—हा एकप्रकारे मनाचा आरसाच आहे.
Sakal
Sakal