घरकाम सोपं बनवा! स्मार्ट किचन हॅक जे खूप उपयोगी ठरतील

Aarti Badade

मसाल्यांचे व्यवस्थापन

फोडणीसाठी किंवा पदार्थांत घालण्यासाठी आवश्यक असलेले मसाले आधीच एका छोट्या ताटात काढून ठेवा.

Sakal

मसाल्यांचे मिश्रण

काही विशिष्ट मसाल्यांचे मिश्रण आधीच तयार करून मुख्य डिशमध्ये घातल्यास, पदार्थाला उत्कृष्ट आणि वेगळा स्वाद येतो.

Sakal

कोथिंबीर, पुदिन्याची काळजी

कोथिंबीर, पुदिना ओल्या कापडात गुंडाळून एअरटाइट कंटेनरमध्ये फ्रिजमध्ये ठेवा—ते जास्त दिवस ताजे राहतील.

Sakal

दह्याचा आंबटपणा

दही वापरण्यापूर्वी १५-२० मिनिटे फ्रिजच्या बाहेर ठेवल्यास, त्याचा आंबटपणा कमी होतो आणि चव सुधारते.

Sakal

सुगंधित भात

भात शिजवताना पाण्यात एक-दोन तेजपत्ते आणि लवंगा घातल्यास, भाताला सुंदर आणि खास सुगंध येईल.

Sakal

कांदा भाजण्याची टीप

कांदे भाजताना त्यात थोडे मीठ टाका; त्यामुळे ते लवकर आणि चांगले भाजले जातात.

Sakal

मीठ चिकटू नये म्हणून

मिठाच्या जारमध्ये काही तांदळाचे दाणे किंवा ब्रेडचा छोटा तुकडा टाका; यामुळे ओलावा शोषला जाऊन मीठ सैल राहते.

Sakal

ओल्या कचऱ्याची पेटी

स्वयंपाक करताना सोलणे आणि चिरणे यातून निघालेल्या ओल्या कचऱ्यासाठी बाहेर स्वतंत्र डस्टबिन ठेवा.

Sakal

मायक्रोवेव्ह स्वच्छ करण्याची नवी ट्रिक! पाहा 'अँग्री मॉम'ची जादू!

Sakal

येथे क्लिक करा