Saisimran Ghashi
वास्तुशास्त्रानुसार, स्वयंपाकघर हे घरातील सर्वात महत्त्वाचे स्थान असून ते घरातील आरोग्य, सुख आणि समृद्धीचे केंद्र मानले जाते.
स्वयंपाकघराला अन्नपूर्णा मातेचे निवासस्थान मानले जाते, म्हणून येथे पवित्रता आणि सकारात्मक ऊर्जा टिकवणे गरजेचे आहे.
स्वयंपाकघरातूनच घरात सुख, शांतता, समृद्धी आणि कल्याण येते, त्यामुळे त्याची स्वच्छता आणि व्यवस्थापन महत्त्वाचे असते.
हळद ही भगवान विष्णूशी संबंधित असून ती संपल्यास सौभाग्य आणि आनंद निघून जातो असे मानले जाते.
पीठाचे भांडे रिकामे राहिल्यास गरिबी येते आणि घरातील मान-सन्मान कमी होतो.
तांदूळ पूजेमध्ये अक्षत म्हणून वापरला जातो. घरात तांदूळ नसेल तर शुक्र ग्रह अशक्त होतो आणि देवी लक्ष्मी अप्रसन्न होते.
स्वयंपाकघरात मीठ संपल्याने राहू दोष निर्माण होतो, त्यामुळे अडचणी वाढतात आणि कामांमध्ये अडथळे येतात.
हा लेख सामान्य माहितीवर आधारित आहे. सकाळ माध्यम समूह या माहितीची जबाबदारी घेत नाही.