Swadesh Ghanekar
आंद्रे रसेल ( ५७), अंगकृष रघुवंशी ( ४४), रहमनुल्लाह गुरबाज ( ३५) व अजिंक्यच्या ( ३०) खेळीने KKR ने ४ बाद २०६ धावा केल्या.
रियान परागच्या ९५ धावांनी RR ला विजयापर्यंत पोहोचवले होते, परंतु एक धावेने त्यांना हार पत्करावी लागली.
अजिंक्यने कालच्या सामन्यात ३० धावा करून मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अजिंक्यने युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलला मागे टाकले.
अजिंक्यच्या नावावर ४९६९ धावा झाल्या असून तो ख्रिस गेलला ( ४९६५) मागे टाकून नवव्या क्रमांकावर आला आहे.
८५०९ धावांसह विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर आहे.
रोहित शर्मा ( ६९२१), शिखऱ धवन ( ६७६९), डेव्हिड वॉर्नर ( ६५६५) हे सहा हजाराहून अधिक धावा करणारे फलंदाज आहेत.
सुरेश रैना ( ५५२८), महेंद्रसिंग धोनी ( ५४०६), एबी डिव्हिलियर्स ( ५१६२) व लोकेश राहुल ( ५०५४) हे अजिंक्यच्या पुढे आहेत.