Pranali Kodre
विराट कोहलीने काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौरच्या फॅनमेड पोस्टला लाईक केल्याचे अनेक स्क्रिनशॉट व्हायरल झाले.
अखेर विराटला पुढे येऊन त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं. त्याने स्पष्ट केले की मी फिड क्लिअर करत असताना अल्गोरिदममुळे चुकून लाईक गेलं होतं. त्यामागे कोणताही हेतू नव्हता.
पण त्यानंतर अवनीत कौर आहे तरी कोण अशा चर्चा सुरू झाल्या, तिच्याबद्दल अनेकांना माहिती नाही.
१३ ऑक्टोबर २००१ साली जलंधर येथे अवनीत कौरचा दन्म झाला असून ती एक अभिनेत्री आहे.
तिने हिंदी मालिका आणि चित्रपटात काम केले आहे.
अवनीतने झी टीव्हीवरील डान्स इंडिया डान्स लिटिल मास्टर्स या शोमधून तिची कारकिर्द सुरू केली. त्यानंतर २०१२ मध्ये तिने 'मेरी माँ' मालिकेतून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.
अवनीतने सावित्री-एक प्रेम कहाणी, एक मुठ्ठी आसमान, चंद्रनंदिनी, अलाद्दिन-नाम तो सुना होगा, अशा मालिकांमध्ये काम केले आहे.
तसेच मर्दानी, करिब करिब सिंगल, मर्दानी-२, लव की अरेंज मॅरेज, टिकू वेड्स शेरू अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.