Swadesh Ghanekar
लोकेशच्या शतकाला अभिषेक पोरेल ( ३०), अक्षर पटेल ( २५) व त्रिस्तान स्तब्स ( २१*) यांच्या जोरावर दिल्लीने मोठी मजल मारली.
यंदाच्या हंगामात शतक झळकावणारा लोकेश राहुल हा पहिलाच उजव्या हाताचा खेळाडू आहे. किशन, अभिषेक, प्रियांश, वैभव हे शतकवीर डावखुरे आहेत.
लोकेश राहुलने आयपीएलमधील आज पाचवे शतक झळकावताना शेन वॉटसन, डेव्हिड वॉर्नर व गिल यांना मागे टाकले.
विराट कोहलीने सर्वाधिक ८ शतक झळकावले आहेत. जॉस बटलर ( ७) व ख्रिस गेल( ६) त्याच्यानंतर आहेत.
ट्वेंटी-२०त सात शतक झळकावणारा लोकेश राहुल दुसरा भारतीय फलंदाज आहे. विराट ( ९), रोहित ( ८) व अभिषेक शर्मा( ७) हे पुढे आहेत.
लोकेश राहुलने यंदाच्या पर्वात ११ सामन्यांत ६१.६३च्या सरासरीने ४९३ धावा केल्या आहेत.
आयपीएलमध्ये लोकेश राहुलने ५१७६ धावा केल्या आहेत आणि त्यात ५ शतकांचा सामवेश आहे.
आयपीएलमध्ये तीन वेगवेगळ्या फ्रँचायझीविरुद्ध शतक झळकावणारा तो एकमेव फलंदाज आहे.
लोकेश राहुलने यापूर्वी पंजाब किंग्सकडून ( २) व लखनौ सुपर जायंट्सकडून ( २) शतकं झळकावली आहेत.
मुंबई इंडियन्सविरुद्ध तीन शतकं नावावर असलेला लोकेश राहुल एकमेव फलंदाज आहे.