Pranali Kodre
आयपीएल २०२५ मध्ये रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना खेळवला गेला.
दिल्लीत झालेल्या या सामन्यात केएल राहुलने शतक ठोकले. यासोबतच त्याने एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली.
केएल राहुलने टी२० कारकिर्दीत ८००० धावा पूर्ण केल्या. तो हा टप्पा पार करणारा सहावा भारतीय आणि जगातील ३६ वा खेळाडू ठरला आहे.
याशिवाय केएल राहुल विराट कोहलीला मागे टाकत सर्वात जलद ८००० धावा करणारा भारतीय खेळाडूही बनला.
केएल राहुलने २३७ सामन्यांतील २२४ डावात ८००० टी२० धावा केल्या.
विराटने २४३ डावात ८००० टी२० धावा पूर्ण केल्या होत्या.
याशिवाय केएल राहुल सर्वात कमी डावात ८००० धावा करणारा जगातील तिसरा खेळाडूही ठरला आहे.
पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल असून त्याने २१३ डावात ८००० टी२० धावा केल्या होत्या.
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बाबर आझम असून त्याने २१८ डावात ८००० टी२० धावा केल्या होत्या.
केएल राहुलने विराटला मागे टाकल्याने तो आता चौथ्या क्रमांकावर घसरला आहे.
केएल राहुल विराटच्या पाठोपाठ पाचव्या क्रमांकावर मोहम्मद रिझवान असून त्याने २४४ टी२० डावात ८००० धावा केल्या होत्या.